Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजीनगर: मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर: मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला
Webdunia
शनिवार, 3 जून 2023 (21:34 IST)
छत्रपती संभाजीनगर: तपासकामी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे.
 
तसेच पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींना देखील जमावाने पळवून लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्या ते गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहे.
 
दरम्यान पोलीस भरती प्रकरणाचा तपास करत असताना ते आपल्या पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते.
 
यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस देखील होते. दरम्यान गावात गेल्यावर त्यांनी आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला. तर यावेळी 30 ते 32 लोकं लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन जमा झाले. तसेच जमवाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच जमावातील एकाने हातातील कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी वेळीच स्वतःचं बचाव करत वार चुकवल्याने मोठं अनर्थ टळला. पण याचवेळी त्यांच्या ओठाला कुऱ्हाडीचा दांडा लागला.

Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

नागपुरात 3 मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासह पळाली

LIVE: अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही

अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही!सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अयोध्याहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी ट्रेनची झडती सुरु

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

पुढील लेख
Show comments