गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा १२ डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. परंतु या शपथविधीला एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावाला विधिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पर्यवेक्षकांनी भूपेंद्र पटेल यांचे नाव आमदारांसमोर ठेवले आणि त्यानंतर त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा येत्या १२ डिसेंबरला पार पडणार आहे. या दिवशी भूपेंद्र पटेल यांच्यासह २० मंत्री शपथ घेऊ शकतात. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यानंतर हायकमांडने भूपेंद्र पटेल यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited by- Ratnadeep Ranshoor