Festival Posters

पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक : चित्र वाघ

Webdunia
गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (09:07 IST)
मला अस वाटतं पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे”. असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नावाची घोषणा झाल्यावर शूर्पणखा बसवू नका असे वक्तव्य केलं होते. याबाबत चित्रा वाघ यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 
 
भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ पुणै दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. चित्रा वाघ यांनी शूर्पणखा या विधानावर भूमिका मांडताना म्हटलं आहे की, शूर्पणखा म्हणजे कोणाचे नाव थोडीच आहे. मी फक्त उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. राज्यात रावण खूप फिरत आहेत. मी तुम्हाला तीन रावण दाखवले आहेत. असे अनेक रावण राज्यात आहेत त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको असे कोणा एका व्यक्तिला म्हणाले नाही असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी तीन पक्षाचे सरकार आहे त्यामुळे तुम्ही कोणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शू्र्पणखा काय तर रावणाला मदत करणारी शूर्पणखा हे मला माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकिचा कामात जर मदत करत असेल तर ते आम्हाला कसे चालेल असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. जर पुण्यात कोण शूर्पणखा असेल तर आम्हाला कळवा असेही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments