Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका

Cold snap state
Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (10:14 IST)
उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.
 
तर हिमालयीन भागात हिमवृष्टी होईल असे हवामान खात्याने सांगितले. पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे मागील काही दिवसांपासून हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे.
 
त्यामुळे आता हवामान खात्यानं 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, चक्रिय वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे.
 
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पुन्हा एकदा धुळीचे वादळ निर्माण झालं आहे. येत्या काही तासांत राजस्थान आणि गुजरातमध्येही याचा परिणाम जाणवणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पाकिस्तानी लोकांची ओळख पटवली जात आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: दहशतवाद्यांशी लढणाऱ्या आदिलच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

KKR vs PBKS :आयपीएल 2025 चा 44 वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात

Russia Ukraine War: मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बॉम्बस्फोटात पुतिनचे जनरल ठार

दहशतवाद्यांशी लढणाऱ्या आदिलच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments