Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती आता एका क्लिकवर

Webdunia
शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:41 IST)
शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या न्याय देतानाच शासन गतिशील, पारदर्शी आणि आणखी जबाबदार करणारी ही प्रक्रिया आहे. सामान्यातल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची हमी घेणाऱ्या या वेबसाईटचे (संकेतस्थळाचे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाला लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथील एका शानदार सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचा शुभारंभ झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबनी डॉट इन या वेबसाईटची  सुरुवात त्यांच्या हस्ते करण्यात आली.
 
नागपूर जिल्हा प्रशासनाने पिक्सल स्टार्ट संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने सुरू केलेली ही वेबसाईट एका क्‍लिकवर सर्व शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. या वेबसाईटचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. या वेबसाईटचे लोकार्पण करताना ते बोलत होते. 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांनी दिलेल्या अर्जावर कारवाईची अपेक्षा यामध्ये करण्यात आली आहे. हे काम पंधरा दिवसात झाले नाही तर याठिकाणी दप्तर दिरंगाई होत आहे हे लक्षात येईल. ही माहिती जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्फत संबंधितांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा यासाठीची ही तांत्रिक बांधणी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments