Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देहविक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना दिलासा

Webdunia
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (09:52 IST)
देहविक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये आर्थिक मदत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरीत करण्यात येणार आहे.
 
राज्य शासनाच्या या निर्णयाअनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय  जारी करण्यात आला.
 
सर्वोच्च न्यायालयात दाखल फौजदारी अपिल क्र. 135/2010 (बुद्धदेव करमास्कर विरुद्ध पश्चिम बंगाल आणि इतर ) या प्रकरणामध्ये वेश्या व्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत दि. 21 सप्टेंबर आणि दि. 28 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यात तात्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments