Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाफकिनला कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Webdunia
शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:05 IST)
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
 
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी  मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या  अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
 
यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी  मुख्य सचिवांना सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी 'वर्षा' या सरकारी निवासस्थानी न जाण्यामागील राऊतांचा दावा फेटाळला

LIVE: दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मतदान केले

बृहमुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्प सादर केला, बजेटच्या १० टक्के रक्कम आरोग्य सेवांवर खर्च करेल

निवडणूक प्रचारादरम्यान आपच्या आमदाराने महिलेला दिले फ्लाईंग किस, एफआयआर दाखल

नागपूरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीसोबत घृणास्पद कृत्य, 58 वर्षीय आरोपीला अटक

पुढील लेख