Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cricketer dies : बॉल लागून क्रिकेटरचा मृत्यू

Cricketer
Webdunia
सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (13:33 IST)
क्रिकेट खेळत असताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेंडूचा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता. 6) दुपारी तावशी (ता.पंढरपूर) येथे घडली. विक्रम गणेश क्षीरसागर (वय 35, रा. नेपतगाव, ता. पंढरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एका महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने तावशी (ता.पंढरपूर) येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत नेपतगाव येथील संघ सहभागी झाला होता. दरम्यान दुपारी क्रिकेट खेळत असताना विक्रम क्षीरसागर याच्या गुप्तांगाला चेंडूचा जोरात मार लागल्याने तो जागेवरच कोसळला. यावेळी त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विक्रम याचा मृत्यू झाला. नेपतगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसचे माजी आमदार यांनी राजीनामा दिला

LSG vs MI : लखनौने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले

वक्फ विधेयक मंजूर होताच काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार अब्राहानी यांनी राजीनामा दिला

मराठी भाषेसाठी होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही! मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

पुण्यात कव्वालीत गॅंगस्टरने पैसे उधळले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील लेख
Show comments