Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठशे फुट खोल दरीत फेकले, तरीही गर्भवती वाचली

Webdunia
मंगळवार, 3 एप्रिल 2018 (16:48 IST)

माथेरान येथे एका विवाहित महिलेस तिच्या नवरयाने ८०० फुट खोल दरीत ढकलले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून गर्भवती महिला बचावली आहे. ही   घटना रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये घडली आहे. या महिलेला पोलिस आणि गिर्यारोहकांच्या पथकाने दरीतून सुखरुप बाहेर काढल आहे. सुरेश पवार आणि विजया पवार हे दाम्पत्य सोमवारी आपल्या मुलासह माथेरानला फिरायला आले होते. मंत्रालयात ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुरेश पवारचं विवाहित असलेल्या विजयाशी 9 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या प्रकरणात  सुरेश आणि विजयाची आधी ओळख झाली होती मग ओळखीचं रुपांतर मैत्रीत झाल होत. त्यानंतर सुरेशने विजयाचा मुलांसह स्वीकार केला होता. यातील महिला विजयाला  पहिल्या नवऱ्यापासून तीन अपत्य आहेत. दोन मुलं चेन्नईतील हॉस्टेलमध्ये शिकत असून लहान मुलगा तिच्यासोबत राहतो. मात्र विजयाने तिचा पती कडे  मला तुझ्या घरी घेऊन चल, अशी रट लावली होती. त्यामुळे रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेश पवारने तिचा काटा काढण्याचं ठरवल होता. तिचा काटा काढायला  सुरेश विजयाला माथेरानला घेऊन गेला होता.  तिथे सुरेशने कड्यावरच्या गणपती पॉईंटपासून तिला 800 फूट खोल दरीत ढकल होता. मात्र महिलेचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली आहे. मात्र तिने नवऱ्या विरोधात तक्रार देणार नाही असे पोलिसांना सांगितले आहे.

 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments