Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दादा भुसेंनी पिस्तूलधारी दरोडेखोराला पकडलं

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (09:17 IST)
हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला धाडस करुन पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे.

लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोशी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
 
त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले आणि त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे देखील आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

दिल्लीत धुळीच्या वादळामुळे गोंधळ

LIVE: महाराष्ट्र पोलिसांनी म्यानमारमधील ६० भारतीय नागरिकांची सुटका केली

महाराष्ट्र पोलिसांना मोठे यश, म्यानमारमध्ये सायबर फसवणुकीतून ६० भारतीयांची सुटका

डेंग्यूच्या रुग्णाचे काढले ६ लाख रुपये बिल, अमृत दिले का? आमदारांनी डॉक्टरांना विचारला जाब

महाराज त्यांना कधीही आशीर्वाद देणार नाही, अमित शहांच्या रायगड भेटीवर संजय राऊत यांचा टोला

पुढील लेख
Show comments