Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dahi Handi 2022: दहीहंडीत जखमी गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (11:12 IST)
Free Treatment to Govindas in Government Hospital: देशभरात आज गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहिहंडीसाठी गोविंदाची पथके दही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहे. दहीहंडी उत्सवात अनेक थर रचून गोविंदा दही हंडी फोडतात. गोविंदा पथकांचा थरार या दिवशी पाहायला मिळतो. त्यामुळे दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दहीहंडी पथकातील काही गोविंदा उंच थरवरून पडून जखमी होतात. यंदा या सणाच्या उत्साहात गोविंदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडून दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाली तर, शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल. गुरुवारी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
<

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गोविंदास दुखापत झाल्यास त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी कालच विधानसभेत केली होती.#दहीहंडी

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 19, 2022 >
 गोविंदा पथकातील दहीहंडीच्या थरावरून पडल्यावर मृत्यू झाल्यास संबंधित गोविंदाच्या वारसांना दहा लाख रुपयांची आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच थरावरून पडल्यास अवयव  निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

उद्धव गट बीएमसी निवडणूक एकट्याने लढेल, संजय राऊतांनी केली घोषणा

९ महिने फ्रिजमध्ये बंद महिलेच्या मृतदेहामुळे खळबळ, मुलीच्या लग्नानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता

पुढील लेख
Show comments