Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दणका, भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (22:27 IST)
शिवसेनेने नारायण राणे यांना सिंधुदुर्गात दणका देत भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये २ नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं आहे. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात या नगरसेवक आणि सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपची जनआशीर्वाद यात्रा नसून तीच येड्यांची जत्रा असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. 
 
आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे की, खरतर जन आशीर्वाद यात्रा कोकणात निघाली आणि त्या यात्रेच्या निमित्तानेसुद्धा, तसेच दोन ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधीक स्वरुपात निवडणुका झाल्या होत्या या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनाने भगवा फडकावला आहे. त्याचबरोबर  देवगड नगरपालिकेच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हर्षदा ठाकूर आणि विकास कोयंडे या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणेंना ताकद दिल्यामुळे शिवसेना कोकणात कमकुवत होईल असे सांगण्यात येत होते. विकास कोयंडे अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. 
 
असे लोकं शिवसेनेत का येत आहेत याचं आत्मपरिक्षण भाजपने केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mahindra BE 6e: महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV, फायटर जेटसारखे इंटीरियर, 682 किमी रेंज आणि बरेच काही

पुण्यात भरदिवसा तरुणाची हत्या, धारदार शस्त्राने वार करून खून

LIVE: महाराष्ट्र निवडणुकीबाबत काँग्रेस नेते उद्या निवडणूक आयोगाकडे जाणार

Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2024 महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती

मुंबई पोलिसांना पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला

पुढील लेख
Show comments