Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळेना; राष्ट्रवादीचा टोला

Webdunia
शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (08:18 IST)
मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असे जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मुहूर्त मिळेना आणि आजचाही मुहुर्त टळला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली नाही शिवाय शेतीचे सरकारकडून अद्याप पंचनामे पूर्ण केलेले नाही. द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला असताना मंत्रीमंडळाचा विस्तारही होईना ही दुर्दैवी बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले.
 
हे शिंदे सरकार संविधानिक आहे की नाही याबाबत सुप्रीम कोर्टात दावे – प्रतिदावे सुरू आहेत. तिकडे सगळा वेळ दोघांच्या सरकारला द्यावा लागतो आहे मात्र राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याला मदत किंवा दिलासा द्यायला वेळ नाही असा आरोप करतानाच शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेल्या महिला पायलटची आत्महत्या

मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले, मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय मान्य-एकनाथ शिंदे

Russia-Ukraine War: युक्रेनने पुन्हा अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली, रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments