Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात, मनोज जरांगेचा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप

Webdunia
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (18:09 IST)
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्त्ये मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांना मराठांचा द्वेषी म्हटले आहे. राज्यात फडणवीस यांच्या संमतीशिवाय काहीही होत नाही. त्यांना जे योग्य वाटते ते तेच करतात. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर महायुतीची सत्ता राहणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणत आहे मात्र मराठांना आरक्षण देत नाही. ते शेतीमालाला रास्त भाव देखील देत नाही. आता दिवाळीच्या वेळेस राज्यात आनंदाचा शिधा म्हणून योजना आणली जाईल आणि निकृष्ट साहित्याचे वाटप केले जाईल. फडणवीस कसले सरकार चालवत आहे हे जनतेला आता समजले आहे. राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यांची सत्ता होऊ देणार नाही. त्यांना एकही जागा जिंकता येणार नाही. 

सखेसोयरे अध्यादेशाची सद्यस्थिती काय आहे, फडणवीस कोणाला काम करू देत नाही. मग तो सगेसोयरेंचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो. फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात. या साठी ते सगेसोयरे अध्यादेश लागू होऊ देत नाही. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments