परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत दोन्ही बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकल्या तर, भाजपाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले.