Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालेगावात चक्क भाडोत्री शिक्षकांची नियुक्तीचा प्रकार उघड

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (21:19 IST)
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये नोकरीवर कायम असणाऱ्या शिक्षकांनी चक्क आपल्या जागेवर भाडोत्री शिक्षकांची नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  लाखभर पगार असतांना केवळ 1500 रुपये देऊन भाडोत्री शिक्षकाची नेमणूक करायची, आणि स्वत: घरात बसून पूर्ण पगार घ्यायचा असा प्रकार मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या एका उर्दू शाळेत सुरु आहे.या शाळेत तपासणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. 
 
मालेगावमध्ये महापालिकेची उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये दोन भाडोत्री शिक्षक ज्ञानदान करत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यातील एक महिला मुख्याध्यापकांच्या वर्गावर शिकत होती. तर दुसरा एक शिक्षक दुसऱ्या वर्गावर ज्ञानदान करत होता. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा भांडाफोड झाला. या प्रकाराची  पालकांना सुद्धा माहिती नव्हती.

याबाबत मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त राजू खैरनार म्हणाले की, महापालिकेच्या शाळेत भाडोत्री शिकवत शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर आम्ही पाहणी केली. तेव्हा दोन नोकरीवर नसलेले शिक्षक नोकरीवर कायम असलेल्या शिक्षकांच्या जागेवर शिकवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पंचनामा करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments