Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रात महिलांच्या खात्यात जमा होणार दिवाळी बोनस

Webdunia
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (10:57 IST)
या दिवाळीत महाराष्ट्र राज्यात राज्य सरकार महिलांना दिवाळी बोनस देण्याची तयारी करत आहे. तसेच दिवाळीच्या दिवशी महिलांना दिवाळी बोनस देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतर्गत महिलांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची तयारी केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात ही रक्कम महिलांच्या खात्यात पोहोचेल. 
 
महाराष्ट्र सरकारने राज्यात लाडकी बहीण योजनेची पायाभरणी देखील केली होती. या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांना या महिन्यात दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत महिलांना 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये मिळणार आहे.  
 
अटी काय आहेत?
महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात. सरकारने दिवाळी बोनस देण्याची अट घातली आहे. ज्या महिलांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल.
 
कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे. याशिवाय विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
 
आवश्यक कागदपत्रे-
लाडकी बहीण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करू शकता. जर महिलांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले तर त्या काही आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. तसेच यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वयाचा दाखला आणि रेशनकार्ड आवश्यक असेल. याशिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला आणि मतदार ओळखपत्र देणे आवश्यक असणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

वृद्ध रुग्णाचा लाखोंचा माल चोरल्याप्रकरणी परिचारिकेवर गुन्हा दाखल

World Students Day 2024: जागतिक विद्यार्थी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जाणून घ्या

APJ Abdul Kalam Birthday : मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय

शिंदे सरकारने ऑलिम्पिक कांस्य विजेता स्वप्नील कुसाळे यांचा गौरव केला

पुढील लेख
Show comments