Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई: ढिगाऱ्याखालून एका लहान मुलाला वाचवण्यात यश

Webdunia
मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग नावाच्या इमारतीचा बराचसा भाग कोसळला असून तिथे 40-50 अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
ही चार मजली इमारत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  
 
जवानांना एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश मिळालं आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, "मी दर्ग्यात होतो मागे तेवढ्यात एक माणूस धावत आला की बिल्डिंग कोसळली. ही कमीत कमी 80 वर्ष जुनी बिल्डिंग असेल. या भागातल्या सगळ्या बिल्डिंग या जुन्या आहे. अजूनही 30-40 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे."
 
या इमारतीत सहा-सात कुटुंब राहात असल्याची माहिती मिळत आहे.
 
भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "आम्ही सरकारकडे गेले 4 वर्षांपासून धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतो आहोत पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेलं नाही." प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना घडतात असा आरोपही त्यांनी केला.
 
हा परिसर दाटीवाटीचा, अरुंद गल्ल्यांचा आणि गर्दीचा असल्याने इथे मदतकार्यात अडचणी येत आहेत.
 
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाली की, "ही साधारण 100 वर्ष जुनी इमारत होती. म्हाडाच्या अतिशय धोकादायक इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. म्हणजे म्हाडाने कारवाई करून रिकाम्या कराव्या लागणाऱ्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. पण विकासकाने वेळेत काम केलं की नाही याची चौकशी करावी लागेल. ती आम्ही करूच. पण सध्या मुख्य मुद्दा आहे तो ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ती जागा अतिशय अरुंद असल्याने, तिथे गर्दी न होता बचावकार्य झालं पाहिजे. किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती अजून मिळली नाही. तिथे साधारण 15 कुटुंब राहात होती अशी माहिती मला मिळाली आहे."
 
गृहनिर्माण मंत्री तिथे गेलेत. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आवश्यक मदतीच आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात येतील, असंही ते पुढे म्हणाले.
 
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगडाले यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितलं की, "चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत. शोधमोहीम सुरू आहे. आजूबाजूच्या इमारतींना धोका असून त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य सुरू आहे. NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे." 
 
जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: 'विकसित भारत' अभियानात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची-सीपी राधाकृष्णन

देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत 'विकसित भारत' अभियानात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची म्हणाले राधाकृष्णन

Santosh Deshmukh murder case बीडमध्ये गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा कडक इशारा

महाकाल नगरी उज्जैनमध्ये भीषण अपघात, 3 ठार तर 14 जखमी

कल्याणजवळील आंबिवली गावात भोंदू बाबाने एका मुलीवर केला अत्याचार

पुढील लेख
Show comments