Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार,उद्धव ठाकरे यांचा निर्धार

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार उद्धव ठाकरे यांचा निर्धार
Webdunia
शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (21:16 IST)
शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना बैठकीत दिल्या आहेत.
 
शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिकांनासोबत घ्या. मुंबई महापालिकेमध्ये रिमाइंडर अर्जही देण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? यांसारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना युबीटीला मोठा धक्का कारण अनेक नेत्यांनी पक्ष सोडला

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्र्यांनी घेतला सार्वजनिक दरबार, म्हणाले - महायुतीमध्ये राजकीय शत्रुत्व नाही

महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर 2 जखमी

भरधाव जीप आणि बसची धडक, ६ जणांचा मृत्यू, २ जखमी

तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने हिंदी कविता वाचली नाही, शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस

पुढील लेख
Show comments