Marathi Biodata Maker

'कुणी आपल्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सीडी लावू’

Webdunia
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (07:13 IST)
‘कुणी आपल्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सीडी लावू’ असा स्पष्ट इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करताना दिला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. 
 
यात ते म्हणाले की, आपण ज्या वेळेला भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश याचा विचार केला त्या वेळेला जयंत पाटील यांनी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. ‘कुणी तरी तुमच्या मागे ईडी चौकशीचे नाटक लागेल’ असे ते म्हणाले. यावर खडसे म्हणाले की, ‘कुणीतरी ईडी लावण्याचा प्रयत्न केला तर आपण सीडी लावू’. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये आपण ४० वर्षे संघर्ष केला आपला संघर्ष हा कधी कुणापासून लपून राहिलेल्या नाही खरं तर संघर्ष हा आपला मूळ स्वभाव असल्याचे त्यांनी याप्रसंगी ठासून सांगितले. आपण कधीही महिलेला समोर करून राजकारण केले नाही. मात्र मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपण जनतेची सेवा करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

LIVE: महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments