Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाराज एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (17:11 IST)
भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी  दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी ते पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच ते पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.  
 
महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाट चव्हाट्यावर येऊ लागले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते नजीकच्या काळात भाजपला धक्का देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी खडसे यांना तशी ऑफरही देऊ केली. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments