Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ खडसे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Eknath Khadse
Webdunia
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (16:44 IST)
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे २३ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी भूतकाळातीला काही प्रसंगाचे दाखले देत प्रखर मत मांडलं.
 
एकनाथ खडसे म्हणाले, मला पद न मिळाल्याचं दुख नाही, ताकदीन पद मिळालं, कुणाच्या उपकाराने पद नाही मिळालं नाही, भाजपावर आणि केंद्रीय नेतृत्वावर माझा रोष नाही. मी ४० वर्ष घराघरात भाजपा पोहोचवण्याचं काम केलं.
 
मला पद न मिळाल्याचं दु:ख नाही, माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोषी राहिलो असतो, तर ३ महिने माझे तरुंगात गेले असते, एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण पक्षातल्या पक्षात केलं गेलं. माझी नाराजी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, मी भाजपा नाईलाजाने सोडत आहे. ४ वर्ष मला प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. नाथाभाऊ हा टिंगल करण्याचा विषय केला गेला. माझी यूट्यूबवरची भाषणं ऐका, मी म्हटलंय, मला पक्षाबाहेर ढकलतायत असं मी म्हटलं आहे.
 
मी विधानसभेतही बोललो, आजही बोलतोय, माझा काय गुन्हा आहे ते आजंही सांगावं. मी लाचार नाही, मी कुणाचे पाय चाटत बसलेलो नाही, मी स्पष्ट बोलतो, एवढाच काय तो माझा गुन्हा असेल. भाजपासोडताना मला भाजपातून चंद्रकांतदादांशिवाय कुणाचाही फोन आला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कोण आहे हा संजय राऊत...? भाजपमध्ये ७५ नंतर निवृत्तीचा नियम नाही म्हणाले बावनकुळे

IPL 2025: लखनौला पत्करावा लागला पराभव, पंजाब किंग्जने एकतर्फी विजय मिळवला

महाराष्ट्रात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' लागू होणार, मुलींना मिळणार 10 हजार रुपये

वक्फ संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर होणार, चर्चेसाठी ८ तासांचा वेळ निश्चित

LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments