Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:33 IST)
३४ जिल्ह्यांमधील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबरला होईल, असे  राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे सांगितले.
 
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील. छाननी ५ डिसेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर असेल.  त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत होईल.
 
जिल्हावार संख्या
ठाणे    ४२
पालघर    ६३
रायगड    २४०
रत्नागिरी    २२२
सिंधुदुर्ग    ३२५
अहमदनगर    २०३
अकोला    २६६
अमरावती    २५७
औरंगाबाद    २१९
बीड    ७०४
भंडारा    ३६३
बुलढाणा    २७९
चंद्रपूर    ५९
धुळे    १२८
गडचिरोली    २७
गोंदिया    ३४८
हिंगोली    ६२
जळगाव    १४०
जालना    २६६
कोल्हापूर    ४७५
लातूर    ३५१
नागपूर    २३७
नंदुरबार    १२३
उस्मानाबाद    १६६
परभणी    १२८
पुणे    २२१
सांगली    ४५२
सातारा    ३१९
सोलापूर    १८९
वर्धा    ११३
वाशीम    २८७
यवतमाळ    १००
नांदेड    १८१
नाशिक    १९६

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments