Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटल सेतूच्या तडाबाबत काँग्रेसच्या आरोपांवर फडणवीसांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

Webdunia
शनिवार, 22 जून 2024 (17:34 IST)
अटल सेतू पुलाला काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोळे यांनी भेट दिली आणि पुलाला तडे गेल्याचा व्हिडीओ शेअर केला. फोटो शेअर करताना ते म्हणाले, नुकतेच उदघाटन झालेल्या अटल सेतूला एवढ्या लवकर तडे जाणे हे चिंताजनक आहे. महाराष्ट्र कांग्रेस प्रमुख नाना पटोले यांनी देखील अटल सेतु मध्ये आलेल्या तडांबद्दल महायुती सरकार वर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की गेलेले तडे महायुती सरकारचे भ्रष्टाचार दाखवते. तसेच म्हणाले की प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. ते म्हणाले की या प्रकरणाला महाराष्ट्र विधानसभा मध्ये मांडण्यात येईल.
 
तसेच पटोलेंनी आरोप लावले की,  राज्य सरकार ने भ्रष्टाचारची सर्व मर्यादा पार केली आणि लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे. तसेच ते म्हणाले की, उद्घाटन नंतर तीन महिन्याच्या आत अटल सेतू पुलाच्या एका भागाला तडा गेला आहे आणि नवी मुंबईजवळ रस्ता अर्धा किलोमीटर लांब हिस्सा एक फुट पर्यंत धसाला आहे. राज्य ने एमटीएचएलसाठी 18,000 करोड रुपये खर्च केले आहे. 

महायुती सरकार आता प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करीत आहे. ते म्हणाले की, मी जे दाखवत आहे ते आरोप नाही, सत्य आहे.
 
या वर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे, कि, अटल सेतूला कोणतेही तडे गेले नाही. आणि पुलाला कोणताही धोका नाही. पटोले यांनी शेअर केलेला फोटो अप्रोच रोडचा आहे. 
काँग्रेस पक्ष खोट्याचा आधार घेत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी फोनद्वारे ईव्हीएम अनलॉक करण्याचा खोटा अवलंब केला, संविधान बदलण्याचे म्हटले,  आता हे अटल सेतूला तडा गेल्याचे खोटे बोलत आहे. 
 

फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे, अटल सेतूला काही तडा गेलेला नाही आणि त्याला कोणताही धोका नाही. पण हे स्पष्ट आहे की, काँग्रेस पक्ष आता तडा ला घेऊन मोठी लांबलचक योजना आखली आहे. पण देशातील जनता काँग्रेसच्या भ्रष्ट कारस्थानाला हाणून पाडेल.

हा पूल अंदाजे 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा आहे. 16.5 किमी लांबीचे समुद्रावर बांधले आहे आणि सुमारे 5.5 किमी जमिनीवर बांधले आहे. हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करते. यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटीसाठी हे अधिक चांगले आहे

Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

5 वर्षाच्या पोटाच्या मुलीची गळा दाबून हत्या, आईला करायचे होते दुसरे लग्न

Assembly Election Result : पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा आणि अतूट विश्वासाचा परिणाम- मुख्यमंत्री योगी

पुढील लेख
Show comments