Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Falguni Pathak : फाल्गुनी पाठकच्या शोच्या नावाने तरुणांची फसवणूक

Falguni Pathak
Webdunia
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (15:56 IST)
मुंबईच्या प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या गरबा नाईटच्या पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 156 तरुणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तरुणांना सव्वा पाच लाख रुपयांची केली आहे. या प्रकरणी तरुणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.   

बोरिवली पश्चिम येथे फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणाऱ्या  एका तरुणाची माहिती कांदिवलीतील एका तरुणाला मिळाली. शाह कडून या कार्यक्रमाचा पास  4500 रुपयांऐवजी 3300 रुपयांना मिळणार अशी माहिती मिळाली.त्यामुळे तक्रारदार आणि त्याचे मित्र पास घेण्यास तयार झाले. ही माहिती त्याने इतरांना दिली. अशा प्रकारे 156 जण पास खरेदी करण्यास तयार झाले.

फिर्यादीने सांगितले की त्याने आणि दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा करून शाह ला दिली. त्याने फिर्यादीला गुरुवारी ठरलेल्या जागी पोहोचण्यास सांगितले आणि पैसे घेऊन शहाचा माणूस पास देण्याचे ठरले. त्या तिघांनी एका व्यक्तीला पैसे दिले आणि त्याने पास घेण्यासाठी एका इमारतीचा पत्ता दिला तिघे तिथे पोहोचल्यावर त्यांना इमारत सापडली नाही आणि शहा ला वारंवार फोन केल्यावर देखील त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांत  शाह आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलीस शहा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit      

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

ऑगस्टमध्ये 3 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्यासाठी टीम इंडिया बांगलादेशचा दौरा करणार

पत्नीच्या गुप्तांगावर हळद- कुंकू लावून लिंबू पिळले, पुण्यात पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

LIVE: फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

मुंबईत मान्सून कधी येणार, आयएमडीने सांगितले

Sudiraman Cup: सुदिरमन कपमध्ये पीव्ही सिंधू- लक्ष्यसेन आव्हानाचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments