Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक

Webdunia
बुधवार, 8 मार्च 2017 (17:10 IST)
सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधक आज आक्रमक झाले. विधानभवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , आमदार विद्या चव्हाण,  आ. विक्रम काळे , आ. राजेश टोपे  व अन्य आमदार उपस्थित होते.
 
गेल्या दोन वर्षांत ८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी १० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी विधिमंडळातील १५० पेक्षा जास्त सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे ते म्हणाले.
 
आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, परिचारक यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे त्यामुळे त्यांना सभागृहातून कायस्वरुपी बडतर्फ करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान सभागृहातही विरोधीपक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी लावून धरली त्याच मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.
 
दरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीचे पडसाद विधान परिषदेतही सातत्याने उमटत असून या सरकार याबाबतीत सरकार काय भूमिका घेणार हे कळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. विरोधक आक्रमक झाल्याने विधान परिषदेचे कामकाजही १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments