Marathi Biodata Maker

पीककर्ज वाटपाच्या गंभीर संकटामुळे विदर्भ मराठवाड्यात कृषी संकट वाढणार

Webdunia
मंगळवार, 6 जून 2017 (11:26 IST)

पश्चिम विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजुनही गती मिळालेली नाही. कर्जमाफीविषयी मंत्र्यांची बेजबाबदार विधाने आणि त्यामुळे शेतकर्यांनी संभमावस्थेत कर्जाची  परतफेड न करणे, बँकांची वसुली कमी होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असून या स्थितीत शेतकर्र्यांना अखेरीज खाजगी सावकारांकडे धाव घ्यावी लागेल आणि शेतकर्र्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भिती स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अद्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे

संपुर्ण महाराष्ट्रात उद्दीष्टांच्या तुलनेत केवल १४ टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्ज वितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले आहे परंतु त्याला बँकांकडून मिळत असलेला असहकार्य  या पार्शव भुमिवर  किशोर तिवारी यांनी कृषी संकट शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्यात अधिक गंभीर होणार असा अहवाल  सरकारकडे दिला असुन, उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाल्यानंतर येथील राजकीय नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या.

शेतकऱ्यांनी  कर्जाची परतफेड करण्यासाठी हात आखडता घेतला. त्यामुळे बँकेचे अधिकारी हे जिल्हा प्रशासनाकडे वसुलीसाठी मदत करा, असा तगादा लावत आहेत. यावेळी कर्ज वितरण विस्कळीत होऊन गेले आहे. सरकारने पतपुरवडा तात्काळ नियमित करणे व त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणे काळाची गरज झाली आहे . 
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर पोलिसांची कारवाई

अंबरनाथमध्ये शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव

प्रयागराजमधील माघ मेळ्यात भीषण आग लागली; तंबू आणि दुकाने जळून खाक

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार संपला; १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांमधील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमद्वारे निश्चित केले जाईल

राहुल गांधी अयोध्येला भेट देणार, काँग्रेस खासदाराचा दावा

पुढील लेख
Show comments