Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : किसान परिषद, सरकारला दिली दोन दिवसांची मुदत

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (10:48 IST)
राज्यातील शेतकरी संपाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या किसान परिषदेत शेतकऱ्यानी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत आंदोलन अजून मोठे करत राष्ट्रव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १२ जूनला राज्यात तहसील आणि जिल्ह्याधिकारी कार्यालयांना धरणे देण्यात येणार आहेत. तर १३ जूनला सर्वत्र चक्काजाम, रेलरोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी परिषदेच्या मंचावर सरकारमध्ये सामील असलेले खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडू, तर कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप व्यासपीठावर कसे असा प्रश्न करत एका महिला कार्यकर्तीने व्यासपीठावर माईकचा ताबा घेतला. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडला होता.

शेतकरी वर्गाने ऐतिहासिक संप पुरल्यानंतर त्यात फुट पडली. गुरुवारी काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू झाले. मात्र अद्यापही शेतकऱ्याचा एक गट संपावर ठाम आहे. याच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमधील तूपसाखरे लॉन्सवर सर्व शेतकरी संघटनांची परिषद पार पडली. सुरुवातीला सुकाणू समितीची बैठक झाली त्यानंतर परिषद झाली.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments