Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन

farmer-dharma-patil-who-tried-to-commit-suicide-in-mantralay-passes-away
Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:47 IST)
काही दिवसांपूर्वी  मंत्रालयात विष प्राशन केलेले  शेतकरी धर्मा पाटील  (80 ) यांचे मुंबईतील जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22  जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं. मात्र प्राण वाचवण्यात अखेर अपयश आले. धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.  इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पोकळ आश्वासने देणे थांबवा, आम्ही हिंदुत्व सोडले आहे की तुम्ही? उद्धव ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला

पालघर : डोळ्यात तिखट फेकून दरोडेखोरांनी लाखो रुपये लुटले, पोलिसांनी लग्न निमंत्रण पत्रिकेच्या मदतीने गुन्ह्याची उकल केली

वनमंत्री गणेश नाईक ४ एप्रिल रोजी वाशी येथे जाहीर सभा घेणार

पुढील लेख
Show comments