Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालेगाव वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (09:01 IST)
विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यासह त्याच्या वडिलांचाही वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली आहे. पिता- पुत्राच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
सध्या कांदे काढणीचा हंगाम सुरू आहे. खडकी येथील समाधान पंढरीनाथ कळमकर (३०) हा तरुण शेतकरी कांदे काढण्यासाठी सकाळी ८ वाजताच कुटुंबासह शेतात गेला होता. तेथे असलेल्या मजुरांसाठी पाणी आणण्यासाठी तो विहिरीवर गेला.
 
आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता. ही बाब लक्षात न आल्याने समाधान याने वीजेची मोटार सुरू करताच त्याला वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिल्याने शेजारीच असलेल्या वडिलांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातानेच मुलाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही वीजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे समाधान तसेच पंढरीनाथ पांडुरंग कळमकर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments