Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतक-यांना मिळणार इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (09:02 IST)
लातूर : जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दो-याअंतर्गत प्रक्षेत्र भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतक-यांना इतर राज्यातील शेती उद्योगाची माहिती व्हावी, यासाठी अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक शेतक-यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे. शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतक-यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे हा राज्याबाहेरील अभ्यास दौ-याचा उद्देश आहे.
 
अभ्यास दौरा राबवताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खाजगी कंपन्या, संस्था कृषी विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. अभ्यास दौ-याचा कालावधी हा जास्तीत जास्त ७ दिवसांचा राहील. यामध्ये प्रवास खर्च निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील. प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थ्याला स्वत: करावा लागेल. या अभ्यास दौ-याअंतर्गत महिला किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अभ्यास दौ-यासाठी फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणा-या, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळ प्रक्रिया इत्यादीबाबत इच्छुक असणा-या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी लाडके यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments