Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर जिल्ह्यात पिता- मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

water death
Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (10:03 IST)
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात मल्हिप्परगा गावात तलावाच्या पाण्यात गुऱ्यांना अंघोळीला घेऊन गेलेल्या शेतकरी वडील आणि मुलाचा बुडून मृत्यू झाला. 

सदर घटना 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. शेतकरी तिरुपती बाबुराव पवार हे आपल्या 12  वर्षाच्या मुला नामदेवसह शेताच्या जवळ असलेला तलावात गुरांना अंघोळीसाठी घेऊन गेले असता एक बैल खोल पाण्यात जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी 12 वर्षाचा नामदेव हा किनाऱ्यावर आणण्यासाठी गेला आणि पाण्याची खोली न कळल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. 

त्याला बुडताना पाहून तिरुपती देखील पाण्यात गेले आणि पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. 
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या घट्नेनन्तर  गावात शोककळा पसरली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: RBI च्या स्थापना दिनानिमित्त द्रौपदी मुर्मू मुंबईत

ठाणे: दोन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर चाकूहल्ला, मृतदेह नदीत फेकून दिला

MI vs KKR : मुंबईने २४ व्यांदा केकेआरला हरवले

मुंबईमध्ये 'इफ्तारी' वाटण्यावरून वाद, एकाची चाकूने भोसकून हत्या

नागपुरात पत्नीने पतीचे काळे कृत्य उघड करून त्याला तुरुंगात टाकले

पुढील लेख
Show comments