Dharma Sangrah

'त्या' दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (16:02 IST)
भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारीका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज रुग्णालयातील दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
 
भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या घटनेमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

रमाबाई आंबेडकर स्मृतिदिन : मायेची सावली रमाबाई भीमराव आंबेडकर

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

पुढील लेख
Show comments