Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर नाशिकचा ‘तो’ बहुचर्चित विवाह सोहळा थाटात पार पडला

Webdunia
शुक्रवार, 23 जुलै 2021 (08:37 IST)
लव जिहाद चा रंग देऊन हिंदू- मुस्लिम धर्मातील होणाऱ्या त्या विवाह सोहळ्याला काही हिंदू संघटनांनी विरोध दर्शविला होता तो विवाह सोहळा अखेर मोठ्या थाटा माटात संपन्न झाला आहे..
अखेर नाशिक मधील तो बहुचर्चित विवाह सोहळा शुक्रवारी  संपन्न झाला.रसिका आडगावकर आणि आसिफ खान या हिंदू आणि मुस्लिम धर्मातील दोघांचा विवाह सोहळा 18 जुलै रोजी संपन्न होणार होता, परंतु काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला होता.त्याचप्रमाणे या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिकेला सोशल मीडियावर व्हायरल करत याला लव जिहादचा रंग देण्यात आला होता.त्यानंतर दोन्ही परिवारातील लोकांनी हा लग्न सोहळा रद्द करत पुढे ढकलला.अशातच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक दौऱ्यावर असताना या विवाह सोहळ्याला आपला पाठींबा दर्शविला होता.अखेर दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत शहरातील एका हॉटेलमध्ये हा आसिफ आणि रसिका यांचा विवाहसोहळा दोन्ही समाजातील धार्मिक पद्धतीने मोठ्या आनंदात आणि थाटामाटात संपन्न झाला.त्यांच्या या विवाह सोहळ्याने दोन्ही परिवारातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यांनी प्राग मास्टर्समध्ये अनिश गिरीचा पराभव केला

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला

मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला

ठाणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशिंना अटक केली

ठाणे सामूहिक दुष्कर्म प्रकरणात न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा देत दंडही ठोठावला

पुढील लेख
Show comments