Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरवस्तीती फटका दुकानांना आग २०० दुकाने जळाली

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (14:50 IST)
औरंगाबादमध्ये फटाका मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र या भीषण आगीत  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. प्राथमिक अहवालानुसार या भीषण  आगीत दीड ते दोन कोटींचं नुकसान झालं आहे.. 
 
 शहरातील गजबजलेल्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे फटाके मार्केट भरवण्यात येतो. यंदा मोठ्या उत्साहाने फटाका मार्केट स्टॉल सजवण्यात आले. मात्र, औरंगाबादकरांच्या दिवाळीला गालबोट लागले. फटाका मार्केटला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अवघ्या काही तासांत २००  फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली आहेत . या आगीत अनेक वाहनं आगीच्या भस्मसात झाली आहे. परिसरात धुराचे मोठे लोट दूरहुन दिसत होते. गंभीर बाब म्हणजे निवासी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे

भडकाऊ भाषण देऊन ओवेसी अडकले; पोलिसांनी पाठवली नोटीस, काय आहे गुन्हा?

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताचा सलग तिसरा विजय

विदर्भात62 पैकी 36 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत

पुढील लेख
Show comments