Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील बहुमजली रुग्णालयाच्या इमारतीला आग, चार जखमी

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (19:31 IST)
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील बहुमजली रुग्णालयाच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागून चार जण होरपळले असून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
 
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेतील न्यू लिंक रोडवरील न्यू विन्स हॉस्पिटलमध्ये दुपारी 1.48 च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुपारी २.०५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, सेंट्रलाइज्ड एसी युनिटचे कॉम्प्रेसर आदींपर्यंतच होती

वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. सध्या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत   स्वाधीन मुखी (56), राजदेव (35), नरेंद्र मुर्या (45) आणि सुनील (35) हे चार जण जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरु आहे. चौघांची प्रकृती स्थिर आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आसाममधील करीमगंज जिल्हा आता 'श्री भूमी' म्हणून ओळखला जाईल, हिमन्त बिस्वा सरमा यांची घोषणा

LIVE: रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

Hockey : भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला

विधानसभा निवडणुकीत झारखंड आणि महाराष्ट्रातून 1000 कोटी रुपये जप्त

पुढील लेख
Show comments