rashifal-2026

चार जणांचा बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2019 (09:50 IST)
ठाण्यात दोन अल्पवयीन मुले तर अक्सा बीचवर तरुण बुडाले आहेत. पहिल्या घटनेत घरी न सांगता खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या शुभम देवकर (15), प्रवीण कंचारी (15) या दोन मुलांचा ठाणे पूर्व मीठबंदर रोड येथील विसर्जन घाटावर रविवारी बुडून मृत्यू झाला. हे दोघे कोपरी येथील महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाचा अर्ज भरून विसर्जन घाटावर (खाडीवर) पावसाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत शुभम आणि प्रवीण घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. दोघे हरवल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यांचा शोध घेत असताना खाडीकिनार्‍यावर या दोन्ही मुलांचे कपडे दिसून आले. त्यानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला. दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. दुसर्‍या घटनेत आक्सा बीचवर बाबू द्रवीड (22) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर विघ्नेश दास द्रविड(21), विशाल द्रविड (23) यांना पर्यटकांनी वाचवले. हे तिघेही कांदिवली पूर्व, शास्रीचाळ आण्णानगर येथील रहिवासी होते.

फोटो: सांकेतिक

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

T20 World Cup 2026: ICC च्या बैठकीत बांगलादेशला 'भारतात खेळा किंवा बाहेर पडा' असा अल्टिमेटम देण्यात आला

LIVE: १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात दारू विकली जाणार नाही!

Video यमुना नदीत कालिया नाग दिसला? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यामागील संपूर्ण सत्य जाणून घ्या

लातूर : पतीच्या कृत्यामुळे संतापलेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलीला दिला भयंकर मृत्यू

पुढील लेख
Show comments