Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोर्ट सुपरिटेडेंट महिलाची सरप्राइज गिफ्टच्या नावाखाली फसवणूक

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (08:44 IST)
न्यायालया सारख्या शासकीय कार्यालयात मुख्य पदावर काम करून निवृत्त झालेली कोर्ट सुपरिटेडेंट महिला सरप्राइज गिफ्टच्या हव्यासापोटी फसली गेल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे. या महिलेने एका परदेशी व्यक्तीच्या नादाला लागून सराप्रायाझ गिफ्टपायी १ कोटी १२ लाख रुपये गमावले आहेत. या फसवणुकीबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे या महिलेने यासाठी कर्जही काढले आहे.
 
अलिबाग येथे राहणारी एक महिला २०२१ ला कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाली. या महिलेचे फेसबुक या सोशल साईटवरही खाते होते. फेसबुकवर तिला एका इंग्लंडमधील इसमाची मैत्रीची रिक्वेस्ट आली आणि तिथेच ती फसली. त्या इसमाने गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्याच्या गोड बोलण्यात महिला पूर्णपणे फसली याची खात्री झाल्यावर त्याने तिला गंडवण्याचा बेत आखला. या इसमाने आपल्या योजनेत अजून सहा जणांना घेतले.
 
इंग्लंडमधून तुला सरप्राईज म्हणून गिफ्ट पाठविले असल्याचे तिला सांगण्यात आले. कस्टम ऑफीस, दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता, गिफ्ट टॅक्स, गिफ्टमध्ये असलेली करन्सी एक्सचेंज टॅक्स, त्याचप्रमाणे गिफ्ट पार्सल मध्ये सोने व करन्सी असून इंडीयन रुपयात याची किमत 99 लाख रुपये असल्याचे पटवून देण्यात आले. गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादीने खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकूण किती पैसे भरायचे आहेत याबाबत सांगितले. जवळ जवळ एक कोटी एवढी मोठी रक्कमेची समोरुन अनोळखी माणसे मागणी करत असतानाही, या महिलेला संशय आला नाही, हे विशेष.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments