Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्गावरुन एसटीची सेवा…. नागपूर ते शिर्डी अवघ्या ६ तासात… एवढे आहे तिकीट…. अशा आहेत वेळा

Webdunia
शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (08:57 IST)
नागपूर – महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जात आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना जलदगतीने प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर कमी झाले असून अवघ्या ६ तासांत शिर्डी गाठणं नागपूरकरांना शक्य होत आहे.
 
समृद्धी महामार्गाचे उदघाटन होण्याची प्रतीक्षा अनेकांना लागली होती. आता या महामार्गावर लालपरीदेखील धावणार आहे. एसटी महामंडळाकडून आजपासून नागपूर – शिर्डी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवाशांना २ X १ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसनेदेखील आहेत. सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे.
 
अशा आहेत वेळा
शिर्डीसोबतच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात आली असून, ही बससेवा नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे.
 
एवढे आहे प्रवास भाडे..
नागपूर ते शिर्डी या मार्गावरील बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ती १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच, ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे. तर नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे, तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

नेकटाईच्या झुल्यात अडकून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

LIVE: काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली

Santosh Deshmukh murder पोलिसांना अपयश म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा मागितला

देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत 'विकसित भारत' अभियानात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची म्हणाले राधाकृष्णन

Santosh Deshmukh murder case बीडमध्ये गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा कडक इशारा

पुढील लेख
Show comments