Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

FYJC 11th Admission : आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, 'इथे' वाचा संपूर्ण प्रक्रिया

Webdunia
शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:52 IST)
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर,नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.
 
सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. वरील पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
 
अशी असेल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :

* 14 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्ज भाग - 1 भरता येईल.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची पडताळणी करण्यासाठी जवळच्या कॉलेज किंवा मार्गदर्शक केंद्रावर जाता येईल.

* 17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरता येईल.

यात विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी पसंती प्राधान्यानुसार द्यायची आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल.

* 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी ( मेरीट लीस्ट) जाहीर होणार.प्रवेश अर्जात काही बदल करायचे असल्यास संधी दिली जाणार आहे.

* 27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार.

* 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे.

* 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे,पिंपरी चिंचवड तसेच नागपूर,नाशिक,व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
 
* न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
 
ऑनलाईन अर्ज भरणे,विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
 
प्रवेशाकरिता https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल.तसंच अधिक माहितीसाठी doecentralize11state@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments