Dharma Sangrah

गोंदियात 100 रुपयांसाठी मित्राची हत्या

Webdunia
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (13:06 IST)
अवघ्या 100 रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली. हे दोन्ही मित्र मालवाहक ऑटो चालक होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. चिराग शेंडे (25 वर्ष) असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे (32 वर्ष) याला अटक केली आहे.
 
आरोपी विजय सहारे आणि मृत चिराग शेंडे हे दोघेही गोंदिया शहरातील महाराणा प्रताप चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मालवाहक गाड्यांचं ऑटो स्टँड आहे येथेच आपले मालवाहक ऑटो लावत असून दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दिवाळीत चिरागने विजयला 500 रुपये व्याजाने दिले होते. विजयने व्याजासह 560 रुपये चिरागला परत केले. मात्र व्याजाचे आणखी 100 रुपये देण्यासाठी चिरागने विजयकडे तगादा लावला होता.
 
पैसे देऊनही विजय त्रास देत असल्याने चिराग संतापला होता. शनिवारी सायंकाळी या दोघांमधील वाद विकोपाला गेला, त्यानंतर रागाच्या भरात विजयने आपल्या ऑटोतील लोखंडी सळई काढली आणि त्या सळईने चिरागच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात चिराग गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विजयने घटनास्थळावरुन पळ काढला.
 
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरवत फरार आरोपी विजय सहारे याला घटनेच्या दोन तासाच्या आत अटक केली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'या वेळी, थेट डोक्यात गोळी...' बिश्नोई टोळीकडून पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

LIVE: NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई: पुण्यातील एका ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक

नीळ्या ड्रमनंतर आता 'हिरव्या ड्रम'चं थरारक रहस्य! पती आणि भावासोबत मिळून प्रियकराचा काटा काढला

पेट्रोल-डिझेलला पर्याय तयार! Tata Motors ची पहिली Flex Fuel कार भारतात लवकरच

पुढील लेख
Show comments