Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शासकीय वसतिगृहाच्या सन २०२१-२२ साठीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (08:37 IST)
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सन 2021-22 साठी वसतीगृह प्रवेश मिळविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे :- शालेय विद्यार्थी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे दि.24 डिसेंबर 2021  व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
 
इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.
 
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
 
बी. ए./बी. कॉम / बी. एस. सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या  पदविका / पदवी आणि एम. ए./ एम. कॉम. / एम. एस. सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि .4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.
 
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.
 
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021.
 
पहिली निवड यादी अंतिम करणे दि.6  जानेवारी 2022 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 20 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 25 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.1 फेब्रुवारी 2022.
 
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश द्यावा (स्पॉट अॅडमिशन) असे पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments