Dharma Sangrah

किल्ल्यांचे संवर्धन लोकवर्गणीतून करण्याचा शासनाचा निर्णय

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (21:39 IST)
राज्यातील काही गडकिल्ले हे केंद्र सरकारच्या तर काही गड राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. पुरातत्व विभागाकडे राज्यातल्या काही किल्ल्यांची नोंद नाही. अशा किल्ल्यांचे संवर्धन लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी निधीही दिला जात आहे, असे राज्याचे  सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
 
शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत गडकिल्ले जतन व संवर्धन आणि सांस्कृतिक कार्य अनुदान मिळण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सीएसआर फंडातून काही निधी मिळवून कामे करण्याबाबत विचार सुरु आहे.
 
केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितरित्या निधी उपलब्ध करुन काम करु शकते, याबाबतही विचार सुरु आहे.  गडकिल्ल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासाठी गृह विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री अमित देशमुख यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

फडणवीस मंत्रिमंडळाचा मास्टरस्ट्रोक: शेतकऱ्यांपासून खेळाडूंपर्यंत, भेटवस्तूंचे दरवाजे सर्वांसाठी खुले

मुंबईच्या महापौर होण्यापूर्वी, रितू तावडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मौन सोडले

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार यांनी विचारलेल्या या प्रश्नांमुळे खळबळ

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 27 आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments