Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरभऱ्याचा भाव 400 रुपयांनी वाढला ; आता ‘इतका’ मिळतोय भाव

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:36 IST)
सध्या  हरभऱ्यासह तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात ५,८०० रुपयांवर असलेले हरभऱ्याचे भावाने ६ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे.
 
बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. दररोज बाजार समितीत ८०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव यांनी दिली. आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर ६,१०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजेच हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ६०० ते ७०० रुपयापर्यंतचा अधिकचा भाव मिळत आहे. तुरीला देखील हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
 
जळगाव बाजार समितीत रब्बी हंगामातील धान्य खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवकदेखील कायम असून, तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिर आहेत. हरभऱ्याला मागणी कायम असल्याने आगामी काही दिवसांत हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

सरपंच खून प्रकरणानंतर विरोध वाढत असताना बीडमध्ये कलम 189 लागू

नितीन गडकरी नागपुरात 9व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिन समारंभात सहभागी झाले

LIVE: नागपुरात 9व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिन समारंभात नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपुरात लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

लग्नानंतर पीव्ही सिंधूने पुन्हा केली इंडिया ओपनची तयारी, म्हणाली-

पुढील लेख
Show comments