Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हर्षवर्धन जाधवांचा ‘या’ पक्षात प्रवेश

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (21:52 IST)
छत्रपती संभाजीनगरात आता BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी BRS पक्षात प्रवेश केलाय.काही दिवसांपूर्वी राज्यात एंट्री करणाऱ्या BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाने आता राज्यात आपला विस्तार वाढवला आहे. दरम्यान आता याच भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री छत्रपती संभाजीनगरात झाली आहे. कारण माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी BRS मध्ये प्रवेश केला आहे.
 
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय पक्षापासून लांब होते.
 
दरम्यान, आता जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. तर हैदराबाद येथे जाऊन हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याचं बोलले जात आहे. तर त्यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्यामार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो.
 
नांदेड जिल्ह्यात आपली पहिली सभा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या विस्ताराचे नारळ फोडले. त्यानंतर महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांनी अनेक मोठ्या चेहऱ्यांच्या शोध सुरु केला आहे.
 
अशातच काही दिवसांपूर्वी नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबत हातमिळवणी करत बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच आता हर्षवर्धन जाधव यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधी शंकरअण्णा धोंडगे आणि आता हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात आपला पक्ष वाढवण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments