Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या रंगाच रांगा, वाशिष्ठी पुलाला भगदाड

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (15:49 IST)
कोकण विभागात रायगड,रत्नागिरी,पालघर,ठाणे,या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली.मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.चिपळूण येथे वाशिष्ठी पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 
 
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती भयानक झाली आहे. चिपळूणला महापुराचा विळखा बसला होता.संपूर्ण पाण्याने वेढले गेले आहे. हजारो लोक पुरात अडकले होते. एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. 
 
दरम्यान, गेल्या चार दिवसापासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या रंगाच रांगा लागल्या आहेत. चिपळूणचा वाशिष्टी पूल खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कुंभार्ली घाट आणि आंबा घाटावर देखील दरड कोसळत असल्यामुळे येथील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.
 
तर सिंधुदुर्गातील आंबोली घाट देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे अवजड वाहन थांबून ठेवण्यात आली आहेत. चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.या ट्रक चकलांचे खाण्या-पिण्याचे देखील हाल झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवीमुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

पंतप्रधान मोदींवरील पुस्तकाच्या प्रचारासाठी स्मृती इराणी चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या

कोल्हापुरात शाळेचे गेट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

LIVE: शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एमव्हीएमध्ये गदारोळ, महायुतीतून हे नाव पुढे आले

पुढील लेख
Show comments