Festival Posters

दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Webdunia
सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (08:50 IST)
राज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पूर्व भारतात तय़ार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यमुळे 27 आणि 28 ऑगस्टला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानुसार गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. त्यातून काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात हलक्या पावसाची शक्यता असेल. राज्यातल्या इतर भागातील हवामानात विशेष बदल होणार नाही. 28 ऑगस्टनंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

२९ मार्च रोजी नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार

मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! नेपाळहून बिहारमार्गे कोट्यवधी रुपयांचे चरस वाहतूक केली जात होती, ४ जणांना अटक

LIVE: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग; १८ कामगारांचा मृत्यू

इराणने एकाच वेळी आठ देशांवर क्षेपणास्त्रे डागली, ट्रम्प यांची 'शासन बदलाची' घोषणा; इस्रायल-इराण हल्ल्याबद्दल १० महत्त्वाचे तथ्य

पुढील लेख
Show comments