Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:58 IST)
हनीट्रॅपच्या माध्यमातून सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिल्याने चंदूर (ता.हातकणंगले) येथील शाहूनगर परिसरात राहणार्‍या यंत्रमाग कामगाराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली असून संतोष मनोहर निकम (वय ३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनेची वर्दी मनोहर निकम यांनी दिली आहे.

दरम्यान, संतोष याच्या मोबाईची पडताळणी पोलिसांनी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. निकम कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे. हनीट्रॅपचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष यंत्रमागावर काम करत होता. शनिवारी रात्रपाळी केल्यामुळे तो घरातील खोलीत झोपला होता. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्याला उठवण्यासाठी दरवाजा वाजवला मात्र त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो दरवाजा तोडून आत आता प्रवेश केला असता आत्महत्त्येचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.
 
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संतोषच्या मोबाईलची पडताळणी केली त्यावेळी सर्वानाच धक्का बसला. संतोषशी सोशल मीडियाच्या माध्यमातून हरियाणातील नेहा शर्मा नामक तरुणीने संपर्क केला होता. व्हिडीओद्वारे दोघांमध्ये संवादही सुरू होता. तिने स्वतः अश्लिल चाळे करत संतोषला आपल्या जाळ्यात अडकवले त्यानंतर त्यालाही अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ती तरुणी संतोषकडे पैसे मागू लागली. १० हजाराची मागणी करण्यात आली होती. मात्र संतोषने पैसे देण्यास नका दिला. त्यानंतर तिने ते अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी संतोषकडे केली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर दोन हजारासाठी तिने तगादा लावला. हनीट्रॅपमध्ये फसल्याचे लक्षात आल्याने संतोषला नैराश्य आले त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. पोलिसांनी हनीट्रॅपच्या अनुषंगाने तपासास सुरुवात केली आहे.
 

संबंधित माहिती

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

पुढील लेख