Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Webdunia
शनिवार, 25 डिसेंबर 2021 (15:47 IST)
प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत पूर्व तसेच पश्चिम उपनगर येथे जमिनीची उपलब्धता होऊ शकते. या जागेवर प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यासंदर्भात खासदार श्रीमती मनेका गांधी आणि माजी खासदार प्रितेश नंदी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर तसेच मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे उपस्थित होते.
श्री.आव्हाड म्हणाले, मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे. प्राणी आपली वेदना सांगू शकत नाहीत. रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राण्यांसाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषणही करण्यात येईल, असे श्री.आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
खासदार मनेका गांधी म्हणाल्या की, मानव आणि प्राणी एकामेकांसोबत आनंदाने रहावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याकरिता काही खासगी संस्थांचाही सहभाग असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

SCO vs AUS : ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय, स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर

EVM बाबत इलॉन मस्कचा इशारा,ईव्हीएम हॅक होऊ शकतात

क्रेडिट कार्डाच्या मदतीनं कोट्यवधी लुटणाऱ्या ठगाची कबुली; कसे लुटले आणि उधळले पैसे

पाकिस्तानच्या यूएन मिशनवर सायबर हल्ला

सुमित नागलची उत्कृष्ट कामगिरी,पेरुगिया चॅलेंजरच्या उपांत्य फेरीत

Father’s Day Wishes 2024:पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

History of Fathers Day फादर्स डे कधी, कसा आणि का सुरू झाला?

फादर्स डे निबंध मराठी Father’s Day 2024 Essay

SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

पुढील लेख
Show comments