rashifal-2026

अबब, किती उंच राष्ट्रध्वज

Webdunia
बुधवार, 23 जानेवारी 2019 (10:16 IST)
मुंबईच्या डोंबिवलीमध्ये १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यावर २० फूट उंची आणि ३० फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. उंचीच्या बाबतीत हा तिरंगा देशात तिसऱ्या तर महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी असेल. विशेष म्हणजे डोंबिवलीतल्या एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीने या चंग बांधला असून त्यासाठी डोंबिवलीत २ एकर उद्यानाची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. भोपर- देसले पाड्यातील लोढा हेरिटेज को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने  ध्वज उभारला जात आहे. 
 
सध्या महाराष्ट्रात पुण्यात आणि देशात वाघा बॉर्डर येथे सर्वात उंच झेंडा उभारण्यात आला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीत हा झेंडा फडकवला जाणार आहे. ‘येत्या २५ जानेवारीला दुपारी अडीच वाजता ८ गोरखा रायफल्सचे कर्नल आर. सी. देशपांडे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचं अनावरण होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष नासीर खान यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: 12च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, या तारखेपासून हॉल तिकीट मिळणार

अबू आझमी यांचे नितेश राणेंवरील वादग्रस्त विधान, म्हणाले- मशिदीत प्रवेश करून दाखवा

शिंदे-फडणवीसां कडून बीएमसी निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबई आणि धारावीसाठी मोठी आश्वासने दिली

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे परिसरात भूकंपाचे धक्के नसल्याचे स्पष्ट झाले

15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments